१) मुंबई अहमदाबाद डबल डेकर ट्रेन जर टिळक पुलाखालून जाऊ शकते तर लो.टि.ट. - मडगाव डबल डेकर टिळक पुलाखालून का जाऊ शकत नाही...???
२) मध्य रेल्वेने लो.टि.ट. - मडगाव डबल डेकरचे वेळापत्रक बदलणे अत्यंत महत्यावाचे आहे. ही ट्रेन रविवारी मुंबईहून मडगावला जाते त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. तसेच परतीच्या वेळी सकाळी लवकर मडगावहून निघते त्यामुळे चाकरमान्यांना ही डबल डेकर सोयीची होत नसल्याने चाकरमानी मांडवी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करणे पसंत करतात.
३) याकरिता ही डबल डेकर ट्रेन दादरहून मुंबईहून सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी ६.२० वाजता गीतांजली एक्सप्रेस नंतर चालवावी आणि मडगावहून...
more... रविवार, मंगळवार आणि शनिवारी मांडवी एक्सप्रेस नंतर सकाळी ११.०० नंतर सोडावी आणि ह्या डबल डेकर ट्रेनला वैभववाडी, पेडणे हे अतिरिक्त थांबे द्यावे जेणेकरून मांडवी, जनशताब्दी आणि कोंकणकन्या एक्स्प्रेसवरील अतिरिक्त ताण कमी होईल आणि चाकरमान्यांना ह्या डबल डेकर ट्रेनचा अधिकाधिक फायदा होईल.