आता तरी रेल्वेने ११०८५/८६ लो.टि.ट. मडगाव डबल डेकरच्या वेळेत आणि वेळापत्रकात लवकरात लवकर बदल करावा. आणि शक्य असल्यास ही ट्रेन दादर (पश्चिम) वरून व्हाया वसई रोड अशी प्रायोगिक तत्वावर चालवावी आणि दिवा स्थानकात थांबा द्यावा जेणेकरून ठाण्याच्या प्रवाश्यांना ही ट्रेन पकडणे सोयीचे होईल आणि मुंबई उपनगरातील चाकरमान्यांनाही या ट्रेनचा फायदा घेता येईल.