अमरावती एक्स्प्रेसला विदर्भातून पसंती
हाऊसफुल्ल : दिवाळी उत्सवाच्या १0 दिवसांत ८४ लाखांचे उत्पन्न
अमरावती : अमरावती-मुंबई (सीएसटी) एक्स्प्रेसला संपूर्ण विदर्भातील प्रवाशांची पसंती कायम आहे. मुंबईकडे ये-जा करायचे म्हटले की, अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणे पसंत करीत असल्याचे आरक्षण तक्त्यावरून दिसून येते. दिवाळी उत्सवाच्या १0 दिवसांत अमरावती रेल्वे स्थानकावरुन ८४ लाखांच्या तिकिटांचा खप झाल्याची माहिती आहे.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रयत्नाने मुंबईकरिता थेट अमरावतीहून ७...
more... सप्टेंबर २00८ रोजी रेल्वेगाडी थाटात सुरु करण्यात आली. या गाडीचा शुभारंभ सोहळाही भव्यदिव्य असा पार पडला. मागील पाच वर्षांंंत अमरावती-मुंबई एक्सप्रेस ही सतत हाऊसफुल्ल धावल्याचा रेकॉर्ड आहे. अमरावती एक्सप्रेसने मुंबई मार्गे जाण्यासाठी वर्धा, पुलगाव, अमरावती, धामणगाव, अकोला, शेगाव, मलकापूर आदी विदर्भातील रेल्वे स्थानकावरुन आरक्षण मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. दिवाळीच्या उत्सवात अमरावती एक्सप्रेसमध्ये वेटींग लिस्टचा आकडा हजाराच्यावर पोहचला होता. या गाडीचे आरक्षण महिन्याभरापूर्वीच हाऊ सफुल्ल होते. परिणामी अनेक प्रवाशांना प्रतिक्षा यादीचे तिकीट घेऊन प्रवास करण्याचा प्रसंग ओढावला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
महिन्याकाठी दोन कोटी ७0 लाखांची कमाई
अमरावती-मुंबई एक्सप्रेसला महिन्याकाठी अमरावती रेल्वे स्थानकावर सुमारे २ कोटी ७0 लाख रुपयांची कमाई होत असल्याची माहिती आहे. हल्ली या गाडीला १८ डबे आहेत. यामध्ये ८ आरक्षण, ४ सामान्य तर ६ वातानुकूलित डबे आहेत. नोव्हेंबर महिन्यात ६ कोटींची कमाई होईल.