Disclaimer   
News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Thu May 25, 2017 18:32:26 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Thu May 25, 2017 18:32:26 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   
<<prev entry    next entry>>
News Entry# 287309
  
Dec 01 2016 (08:05)  अकोला-अकोट मीटरगेज रेल्वे मार्ग १ जानेवारीपासून बंद होणार (epaper.lokmat.com)
back to top
Other NewsSCR/South Central  -  

News Entry# 287309   Blog Entry# 2084906     
   Tags   Past Edits
Dec 01 2016 (8:05AM)
Station Tag: Khandwa Junction/KNW added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Dec 01 2016 (8:05AM)
Station Tag: Akot/AKOT added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Dec 01 2016 (8:05AM)
Station Tag: Akola Junction/AK added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Dec 01 2016 (8:05AM)
Station Tag: Hazur Sahib Nanded/NED added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Dec 01 2016 (8:05AM)
Train Tag: Mhow - Akola MG Passenger/52973 added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Dec 01 2016 (8:05AM)
Train Tag: Indore - Yesvantpur Weekly Express/19301 added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Posted by: 🚂अलविदा खंडवा मिटरगेज🙋🙋~  88 news posts
अकोला : नववर्षाच्या सुरुवातीलाच मीटरगेज रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणास प्रारंभ होणार असून, त्यासाठी १ जानेवारीपासून अकोला-अकोटदरम्यानचा मीटरगेज रेल्वे मार्ग पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी 'लोकमत'ला दिली. स्थानिक अधिकार्‍यांना यासंदर्भात पूर्वसूचना देण्यासाठी ते बुधवारी सायंकाळी अकोल्यात आले होते.
या भेटीदरम्यान 'लोकमत'शी बोलताना डॉ. सिन्हा म्हणाले, की अकोला-अकोटदरम्यानच्या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाकरिता सिकंदराबाद येथील रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले असून, या कामास जानेवारी महिन्यात प्रारंभ होणार असून, त्यासाठी १ जानेवारीपासून अकोला-अकोटदरम्यानचा रेल्वे मार्ग पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार्‍या रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनास राज्य वन विभागाने अनुमती दिली असली, तरी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने त्यास अद्याप हिरवी झेंडी दिलेली नाही. गेजपरिवर्तनाच्या कामात सर्वाधिक अडसर ठरत
...
more...
असलेला हा मुद्दा कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि नागपूर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी २८ व २९ नोव्हेंबर रोजी व्याघ्र प्रकल्पातून जाणार्‍या रेल्वे मार्गाची पाहणी केल्याचे स्पष्ट करीत, लवकरच त्याचा सकारात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या सर्व बाबींची माहिती स्थानिक अधिकार्‍यांना देण्यासाठीच अकोला दौर्‍यावर आलो असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अकोल्यातील उद्योजकांना भेडसावणारा शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्नसुद्धा प्रामुख्याने मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. डीआरएम डॉ. गुप्ता यांनी अकोला भेटीदरम्यान विदर्भ चेंबरच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. २३ डिसेंबरला औपचारिक घोषणा
दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील नवे मुख्य व्यवस्थापक २३ डिसेंबर रोजी अकोला रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यासाठी येणार असून, या भेटीदरम्यान ते गेजपरिवर्तनासाठी अकोला-अकोट मार्ग बंद करण्याची औपचारिक घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  
4862 views
Dec 08 2016 (23:48)
AurngabadPurnaAkolaNagpur~   707 blog posts   1 correct pred (14% accurate)
Re# 2084906-1            Tags   Past Edits
great news #MHNEWS #INDORENEWS
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site