Disclaimer   
News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Tue Apr 25, 2017 06:37:56 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Tue Apr 25, 2017 06:37:56 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   
<<prev entry    next entry>>
News Entry# 289175
  
Dec 20 2016 (11:56)  सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वर्षात पूर्ण (epaperdivyamarathi.bhaskar.com)
back to top
WR/Western  -  

News Entry# 289175   Blog Entry# 2097255     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: vishal~  90 news posts
सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वर्षात पूर्ण
नंदुरबार रेल्वेस्थानकावर करण्यात आले ओव्हरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन
संथगतीनेसुरू असलेल्या सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला आता वेग अाला आहे. हे काम वर्षभरात कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ५०० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी दिली.
येथील रेल्वेस्थानकावर ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी
...
more...
होती. या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. या वेळी त्या बोलत होत्या. खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, नंदुरबार रेल्वेस्थानक अन्य रेल्वेस्थानकांपेक्षा स्वच्छ आहे; परंतु या ठिकाणी काही सुविधा अद्यापही पुरवण्यात आलेल्या नाहीत. नंदुरबार हे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, सुरत-भुसावळ हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गुजरात राज्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम संथगतीने सुरू होते. केंद्रीय मंत्रिपदाचा भार सुरेश प्रभू यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी या कामाकडे जातीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दुहेरीकरणाच्या कामासाठी सुमारे ५०० कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे साहजिकच कामाचा वेग वाढला आहे. हे काम २०१७ मध्ये पूर्णत्वास येईल. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना मुंबई गुजरातला जाण्यासाठी कमी कालावधी लागेल. नंदुरबार ते मुंबई रेल्वे सोडण्याची मागणी प्रस्तावित आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या विषयी निर्णय होईल. नंदुरबार रेल्वेस्थानकात मध्य प्रदेश, गुजरात तसेच अन्य राज्यातील व्यापारी नेहमी येतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी एटीएम असावे, अशी मागणी होती. ही मागणी मान्य झाली असून, लवकरच नंदुरबारच्या रेल्वेस्थानकावर एटीएम सुरू हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  
2610 views
Dec 20 2016 (11:58)
riz339~   2363 blog posts   111 correct pred (57% accurate)
Re# 2097255-1            Tags   Past Edits
St bsl #doubling will compete in 2017
Great

  
1858 views
Dec 20 2016 (13:36)
vishal~   735 blog posts
Re# 2097255-2            Tags   Past Edits
udn jl double line होणे के बाद नंदूरबार मुंम्बई नयी train चलाने का फैसला किया जायेगा
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site