Disclaimer   
News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Mon May 29, 2017 04:08:35 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Mon May 29, 2017 04:08:35 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   
<<prev entry    next entry>>
News Entry# 74969
  
May 29 2012 (23:32)  रेल्वेचा उद्या पाच तास मेगा ब्लॉक (www.esakal.com)
back to top
Other NewsCR/Central  -  

News Entry# 74969     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: Amita  3363 news posts
कामशेत-मळवलीदरम्यान रेल्वेपुलाचे मजबुतीकरण
पुणे- कामशेत-मळवली यादरम्यान रेल्वेपुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बुधवारी सकाळी सव्वानऊपासून दुपारी पावणेतीनपर्यंत साडेपाच तास बंद राहणार आहे; त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलसह डेक्कन एक्‍स्प्रेस आणि अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
या कामामुळे पुणे-कर्जत-पुणे रेल्वे रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून सुटणारी डेक्कन एक्‍स्प्रेस केवळ लोणावळ्यापर्यंत धावेल, तर हीच गाडी लोणावळ्यावरून मुंबईकडे रवाना होणार आहे. पुण्यावरून सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी, 9 वाजून 55 मिनिटांनी, 11 वाजून 30 मिनिटांनी; तसेच बारा आणि एक वाजता निघणारी पुणे-लोणावळा लोकल लोणावळ्याऐवजी तळेगावपर्यंतच धावणार आहे; तर
...
more...
लोणावळ्यावरून पुण्याकडे सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी, 10 वाजून 27 मिनिटांनी, 11 वाजून 30 मिनिटांनी, दुपारी 2 वाजता आणि 2 वाजून 55 मिनिटांनी धावणारी लोकल लोणावळ्याऐवजी तळेगाववरूनच पुण्यास परतणार आहे.
मुंबईतून सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी बंगळूर उद्यान एक्‍स्प्रेस निर्धारित वेळेऐवजी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. तसेच, मुंबईतून सुटणारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोयना एक्‍स्प्रेस सकाळी 8. 40 ऐवजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे.
पुण्याहून दुपारी 1 वाजता सुटणारी लोणावळा लोकल पावणेदोन वाजता सुटणार असून, सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी सुटणारी लोणावळा-पुणे लोकल दुपारी 12 वाजून 26 मिनिटांनी सुटणार आहे.
दरम्यान, हैदराबाद-मुंबई एक्‍स्प्रेस, चेन्नई-मुंबई एक्‍स्प्रेस आणि कोइंबतूरहून निघणारी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा साडेतीन ते पावणेपाच तास उशिरा पोचणार आहेत.
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site