Personal comments will be immediately deleted by our Admins. Admins are NOT obligated to explain their actions. Please respect our Admins' decisions. They are instrumental in maintaining the quality of this forum.
If you do not agree with the above, then please DO NOT POST. Thanks.
अपंग , ज्येष्ठ नागरिक हे देखील समाजाचेच घटक असतात , याचा विसर अनेकांना पडतो . त्यामुळे त्यांच्या अडचणी कधीच केंद्रस्थानी येत नाहीत . अपंग , ज्येष्ठ नागरिकांना दररोजच्या उपनगरीय लोकल प्रवासात येणाऱ्या कष्टप्रद अनुभवांचा कधीही व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केला जात नसल्याचे दुर्दैवाने आढळते . लोकल , बसवाहतुकीचा विचार करताना ही गोष्ट सहज लक्षात येऊ शकते . तीच गत मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेवर जाणवत असते . त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असला तरी अद्याप काहीही ठोस उपाययोजना झालेली नाही . पश्चिम , मध्य आणि हार्बर मार्गावर दररोज ७२ लाखांहून अधिक प्रवासी ये - जा करतात . दर काही मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल आणि त्यातील खच्चून भरणारी गर्दी यातून अपंग प्रवाशांचे हाल होतात . अपंगांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबे असले तरी त्या डब्यांमध्ये अन्य प्रवासी बिनधास्त प्रवास करतात . विशेषतः हार्बर मार्गावर अपंग प्रवाशांना हा अनुभव नेहमी... Read more...
येत असतो . लोकलमध्ये अपंगांसाठी डबा राखीव ठेवण्याचा निर्णय स्तुत्य आहे . मात्र , अपंगांना घर ते स्टेशन गाठण्यापर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . स्टेशनवरही अपंगांना फार काही सुविधा नसतात . प्लॅटफॉर्म चढणे आणि उतरणे ही प्रचंड कटकटीची गोष्ट ठरते . तिथून लोकलमधील अंपगांसाठी राखीव डबा गाठणेही त्रासदायक ठरते . स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दीतून माग काढून राखीव डबे गाठणे ही एक प्रचंड कसरत ठरते .