Timeline UpdatesTrip UpdatesNews PostsPvt PostsAdmin PostsFollowed PostsChat RequestsBlog PostsPNR Posts

Disclaimer
Search
 
 
Sun May 19, 2013 10:51:38 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsMembersLoginFeedback
News Super Search **new        show english news only
<<prev entry    next entry>>
News Entry# 79188  
1 News Items

0 Comments
मनमाड: उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे जंक्शन म्हणनू मनमाड स्थानक ओळखले जाते. आषाढी, कार्तिकी एकादशी निमित्त हजारो भाविक या भागातून पंढरीला जात असतात. इतरही वेळी भाविकांचा पंढरपूरकडे जाण्याचा ओढा असतो. त्यामुळे या भागातील वारकरी, भाविकांनी किमान उत्सवादरम्यानतरी मनमाड-पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे.
उत्तर महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी मनमाड येथून कायमस्वरूपी गाडी असावी अशी या भागातील नागरिक व भाविकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मनमाड हे मध्यवर्ती जंक्शन आहे. चाळीसगाव, नांदगाव, कसमादे, धुळे, चांदवड, येवला या महत्त्वाच्या तालुक्यातील गाव-वस्त्यांमधील अनेक जण पंढरीची वारी करतात. मात्र, या सर्व प्रवाशांना पंढरीला जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध नाही. एसटीचे भाडे अधिक तसेच प्रवासाचा वेळही अधिक असल्याने ते न परवडणारे आहे.
रेल्वेचा प्रवास आरामदायी व प्रवासभाडे कमी असते. म्हणूनच बहुतेक नागरिक रेल्वेलाच पसंती देतात. मात्र, या भागातून एकही रेल्वे
...
Read more...
थेट पंढरीला पोहोचत नाही. प्रवाशांना टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर 26 जून ते 5 जुलैपर्यंत तरी यंदा मनमाड-पंढरपूर अशी थेट रेल्वे सेवा प्रयोगिक तत्त्वावर सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
Scroll to Top