Personal comments will be immediately deleted by our Admins. Admins are NOT obligated to explain their actions. Please respect our Admins' decisions. They are instrumental in maintaining the quality of this forum.
If you do not agree with the above, then please DO NOT POST. Thanks.
मुंबई मध्य , पश्चिम मार्गावरील लोकल ' नियमित ' पणे विस्कळीत होत असताना शनिवारी हार्बर रेल्वेनेही तीच री ओढली . गुरुवारी दुपारी तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास रखडली . या रखडपट्टीने वैतागलेल्या प्रवाशांनी रात्री साडेनऊच्या सुमारास सीएसटी -- बोरिवली लोकल अडवून घोषणाबाजी केली . बेलापूरहून सीएसटीच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये संध्याकाळी ४ . १० वाजता तांत्रिक बिघाड आढळून आला . या बिघाडामुळे हार्बर रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक रखडले . त्याचा परिणाम अप आणि डाऊन दोन्ही ठिकाणी झाला . लोकल ट्रॅकवरच थांबल्याने बेलापूर ते सीएसटी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती . त्यात एकूण सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या . त्यानंतर साधारण पावणेसहाच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला . मात्र , दुपारी कोलमडलेल्या वेळापत्रकाचे परिणाम सायंकाळी उशीरापर्यंत दिसत... Read more...
होते . सीएसटी - बोरिवली ही सांयकाळी ८ . ४५ वाजता सुटणारी लोकल बराच काळ सुटत नसल्याचे पाहून प्रवाशांना ही लोकल अडवून धरली . त्यानंतर रेल्वे पोलिस , आरपीएफच्या जवानांनी परिस्थिती हाताळली . अखेर रात्री साडे नऊनंतर ही लोकल बोरीवलीच्या दिशेने रवाना झाली .