Forum Super Search
 ♦ 
×
HashTag:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Train Type:
Train:
Station:
ONLY with Pic/Vid:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    RailFan Club:    

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Fri Jul 28, 2017 06:31:25 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Fri Jul 28, 2017 06:31:25 IST
PostPostPost Trn TipPost Trn TipPost Stn TipPost Stn TipAdvanced Search
Filters:

Blog Posts by Tamir A Danwade
Page#    1 Blog Entries  
  
0 Followers
1024 views
Feb 04 2011 (13:42)  
 

Tamir A Danwade   1 blog posts
Entry# 105389            Tags   Past Edits
सोलापूर - गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी मिरज ते पंढरपूर या रेल्वेमार्गाची सुरक्षा आयुक्तांकडून होणारी अंतिम तपासणी 8 ते 10 फेब्रुवारी या तारखेला होत आहे. मिरज ते पंढरपूर या 132 किलोमीटर मार्गाची तपासणी समाधानकारक आढळल्यास व या मार्गाबाबत सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविताच या मार्गावरून प्रवासी रेल्वे धावू शकेल, असा विश्‍वास सोलापूर विभागीय रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी व्यक्त केला. बहुप्रतीक्षेत असणारा हा रेल्वे मार्ग काही दिवसातच सुरू होणार असल्याचे दृष्टिपथात आल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार त्रुटी नसतील तर 15 फेब्रुवारी अन्यथा एक मार्च अशा दोन तारखांना हा मार्ग सुरू होऊ शकतो, अशी शक्‍यता आहे.
सोलापूर-
...
more...
कोल्हापूर या गाडीमुळे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांबरोबर पंढरपूरला येणाऱ्या विठ्ठलभक्तांचीही मोठी सोय होणार आहे. म्हणूनच या मार्गावरून धावू शकणाऱ्या नियोजित गाड्यांना लवकरात लवकर हिरवा झेंडा दाखविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पंढरपूर ते मिरज या दरम्यानचे 132 किलोमीटर मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्ग रुंदीकरण 15 जुलै 2008 पासून प्रत्यक्ष सुरू झाले. अडीच वर्षांपासून हे काम सुरू आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून या मार्गावरून मालगाड्यांची वाहतूकही सुरू आहे. रेल्वे प्रशासनातर्फे डिसेंबरपर्यंत 09 हे काम पूर्ण होणार असल्याचे प्रारंभी सांगितले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2010 पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. आता फेब्रुवारी 2011 पर्यंत म्हणजे तब्बल दोन वर्ष हे काम रखडल्याचे दिसून येते. मिरज ते पंढरपूर दरम्यानचे काम आता पूर्ण झाल्याने कर्नाटक, गोवा भागातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सोय होणार आहे.
खंडित परंपरा होईल सुरू
कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी, विजापूर, गोकर्ण, गोवा भागातील लाखो वारकरी मिरजेस येऊन याच गाडीने तर कधी कधी टपावर बसूनही विठ्ठलाच्या दर्शनास जात. ही परंपरा 82 वर्षे टिकली. ब्रॉडगेज वाहतूक सुरू झाल्यावर कर्नाटकसह मिरज कोल्हापूर आदी भागातील वारकऱ्यांना कमी वेळेत येता येईल.
कोल्हापूर ते सोलापूर थेट गाडी
मिरज ते पंढरपूर हा मार्ग सुरू झाल्यास गत रेल्वे अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेली कोल्हापूर ते सोलापूर ही दैनंदिन गाडी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
तीन महाव्यवस्थापकांच्या तीन तारखा
मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापिका सौम्या राघवन यांनी हे काम डिसेंबर 2009 मध्ये पूर्ण होईल, असे जून 2008 च्या पंढरपूर दौऱ्यात सांगितले होते. त्यानंतरचे सरव्यवस्थापक बी. बी. मोडगिल यांनी 2009 या वर्षात केलेल्या वार्षिक तपासणीदरम्यान हा मार्ग फेब्रुवारी 2010 पर्यंत सुरू होणे अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पदावर आलेले व सध्याचे सरव्यवस्थापक कुलभूषण नुकतेच सोलापूर विभागात वार्षिक तपासणीसाठी आले असता त्यांनी फेब्रुवारी 2011 पर्यंत हा मार्ग सुरू होईल असे सूतोवाच केले होते. तीन महाव्यवस्थापकांनी तीन तारखा दिल्याची चर्चा असून किमान आता मार्ग सुरू होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
सुरक्षा आयुक्तांनी अहवालाद्वारे हिरवा कंदील दाखविल्यानंतर लगेचच या मार्गावरून प्रवासी रेल्वे गाडी सुरू होईल. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा यादृष्टीने महत्त्वाचा आहे.
- सुशील गायकवाड, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक

  
825 views
Feb 04 2011 (14:09)
Guest: 795d062a   show all posts
Re# 105389-1            Tags   Past Edits
Any english translation for it plz

  
768 views
Feb 04 2011 (19:46)
Guest: 7bc13e51   show all posts
Re# 105389-2            Tags   Past Edits
Miraj Pandhrpur Inspection on 8-10 feb
If cleared passenger traffic will start either from 15 feb or 1 march

  
762 views
Feb 04 2011 (19:49)
® राहुल जैन ☺ झाडू वाले™🚅🚃🚃🚃🚃🚃*^~   10215 blog posts   14939 correct pred (63% accurate)
Re# 105389-3            Tags   Past Edits
good info
Page#    1 Blog Entries  

ARP (Advanced Reservation Period) Calculator

Reservations Open Today @ 8am for:
Trains with ARP 10 Dep on: Mon Aug 7
Trains with ARP 15 Dep on: Sat Aug 12
Trains with ARP 30 Dep on: Sun Aug 27
Trains with ARP 120 Dep on: Sat Nov 25

  
  

Rail News

New Trains

Site Announcements

 • Entry# 2175399
  Feb 23 2017 (01:22PM)


  There has recently been a lot of frustration among RFs when their Station Pics, Loco Pics, Train Pics get rejected because the "number is not showing", "shed is not visible", the loco/train is at a distance, Train Board is too small, "better pic available", etc. . To address this issue, effective tomorrow, ALL...
 • Entry# 2165159
  Feb 15 2017 (09:53AM)


  A minor update, but may impact many members: Hereafter, FMs will be able to delete invalid Red Flags on Imaginary trains. Red Flags can be removed by FMs, only against specific complaints filed against the blog. This does not give all members the right to complain against EVERY single red flag they...
 • Entry# 2155798
  Feb 08 2017 (11:40AM)


  -@all members: As of recently, there has been a trend whereby minor name updates of Trains/Stations - whether such and such regional name should be there or not, whether the train should be called "Abc Express" or "Abc Superfast Express", etc. are threatening to take over the majority of Timeline entries. Also,...
 • Entry# 2147631
  Feb 01 2017 (11:05AM)


  A new experimental feature is being introduced called BotD - "Blog of the Day". The rules are: . 1. Replies are not eligible - only the Top Blog. 2. ONLY Blogs posted today (the day of the vote) are eligible. 3. Every member has ONE vote. In the course of the day, you may keep...
 • Entry# 2136570
  Jan 23 2017 (12:25AM)


  Several new features have been introduced recently to the Forum, and we are forever striving to make Member experience here more productive and satisfying. With the recent introduction and success of the new FM System, it has been observed that small groups of highly involved and enthusiastic members are far more...
 • Entry# 2134907
  Jan 21 2017 (02:46PM)


  It has been over 2 weeks since the appointment of the current batch of FMs and 750 Complaints have been handled so far. It gives me immense pleasure in congratulating them for running the team diligently, professionally, competently and above all, without a shred of controversy or bias. The FM position...
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.