News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Sat Jan 20, 2018 21:09:05 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Sat Jan 20, 2018 21:09:05 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   
<<prev entry    next entry>>
News Entry# 79227
  
Jun 23 2012 (23:55)  बाइकची रेल्वेतून ने-आण विनापेट्रोल--मध्य आणि पश्चिम रेल्वे---मुंबई (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
Other News

News Entry# 79227     
   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
 
 
आगीच्या शक्यतेमुळे दोन्ही रेल्वेंची खबरदारी--मध्य आणि पश्चिम रेल्वे
``````````````````
मुंबई
एक्स्प्रेस गाड्यांमधील पार्सल डब्यांतून बाइकच्या वाहतुक करताना असलेली आगीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने सावधगिरीचे उचलले आहे . आतापर्यंत या डब्यांतून बाइकमधील टाकीतील पेट्रोलसह सर्रास ने - आण सुरू असायची . मात्र , जूनपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेने पार्सल वाहतुकीदरम्यान बाइकच्या टाकीत पेट्रोलचा एकही थेंब राहणार नाही दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे .
रेल्वेत
...
more...
ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असली तरी भारतीय रेल्वेत एक्स्प्रेसमधील पार्सल डब्यांतून बाइकची ने - आण अनेक वर्षांपासून सुरू आहे . मात्र , दक्षिण भारतात काही दिवसांपूर्वी एका एक्स्प्रेसमध्ये लागलेल्या आगीने परिस्थिती बदलली आहे . ही आग डब्यांमध्ये पेट्रोल पसरल्यामुळे झाल्याचे कळून चुकले . त्यानंतर दोन्ही रेल्वेने जूनपासून लगेचच या वाहतुकीवेळी बाइकमध्ये पेट्रोल नसेल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे .
हा निर्णय केवळ बाइकमधील पेट्रोल काढण्यापुरता मर्यादित नाही . तर , सावधगिरी म्हणून प्रवासादरम्यान बाइकच्या टाकीस जोडला जाणारा पाइपही काढून ठेवला जात आहे .
पश्चिम रेल्वेवर प्रत्येक महिन्यास सुमारे ६५ तर मध्य रेल्वेवर सुमारे ७० बाइक्सची वाहतूक केली जाते . नव्या नियमानुसार आता या बाइक पार्सल डब्यांत नेण्यापूर्वी त्यात पेट्रोल नसेल याची खबरदारी घेण्यासाठी विशेष मोहीमदेखील हाती घेतली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.