Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Once upon a time, there was a great king called Vikramaditya - the WAM-4 - Shashank

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Fri Sep 17 13:20:47 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 288694
Dec 15 2016 (11:13) Construction of 'Panvel-Vasai-Virar' suburban route with 11 new stations (www.lokmat.com)
New Facilities/Technology
CR/Central

News Entry# 288694   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
New 11 stations will be constructed in addition to existing 13 stations:
१. नवीन पनवेल, २. टेंबोडे, ३. पिंधर, ४. निघू, ५. नारीवली, ६. नांदवली, ७. नवी डोंबिवली, ८. पिंपळस, ९. कलवार, १०. डुंगे, ११. पाये गाव.
पनवेल-विरार मार्गावर ११ नवीन स्थानके
वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकलवर पडणारा ताण आणि प्रवाशांच्या मागण्या लक्षात घेत, येत्या काही वर्षांत नवीन रेल्वे स्थानकांची भर मुंबई उपनगरीय लोकल
...
more...
मार्गावर पडणार आहे. एमआरव्हीसीकडून पनवेल-वसई-विरार कॉरिडोर बांधला जाणार असून, या प्रकल्पांतर्गत ११ नवीन स्थानकांचा समावेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पांतर्गत नवी डोंबिवली स्थानकही उदयास येईल. सध्या प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली.
एमआरव्हीसीच्या ११ हजार कोटी किमतीच्या एमयूटीपी-३ ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्यामुळे यातील सर्व प्रकल्प येत्या पाच वर्षांत मार्गी लागू शकतात. या प्रकल्पांबरोबरच एमआरव्हीसीने पनवेल-वसई-विरार कॉरीडोर प्रकल्पही स्वतंत्रपणे मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. प्रकल्पात दोन नवीन लाइन येणार असून, त्यामुळे लोकल प्रवास सुकर होण्यास मदत मिळेल. ७0 किलोमीटर असलेल्या प्रकल्पाची किंमत तब्बल ९ हजार कोटी रुपये आहे. पनवेल-वसई-विरार कॉरीडोरमध्ये एकूण २४ स्थानके आहेत. यामध्ये सध्या याच मार्गावर असणाऱ्या १३ स्थानकांचा समावेश असेल. त्या व्यतिरिक्त आणखी नवीन ११ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब नवीन अकरा स्थानकांत नवीन पनवेल हे स्थानक येतानाच नवीन डोंबिवली स्थानकही उदयास येईल. या संदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, सर्वात मोठा प्रकल्प असून, पाच वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वे बोर्ड, निती आयोगानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अंतिम मंजुरीही लवकरच मिळेल. प्रकल्पात नवीन अकरा स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रस्तावित ११ स्थानके : १. नवीन पनवेल, २. टेंबोडे, ३. पिंधर, ४. निघू, ५. नारीवली, ६. नांदवली, ७. नवी डोंबिवली, ८. पिंपळस, ९. कलवार, १०. डुंगे, ११. पाये गाव.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy