Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

👑King Bole To Mumbai Rajdhani Express - Abdul Rehman

Full Site Search
  Full Site Search  
 
Sun May 26 10:33:19 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 381029
  
Apr 23 (08:14) हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये शंभरवर पशुपक्ष्यांचा गुदमरून मृत्यू (www.google.com)
Crime/Accidents
0 Followers
1768 views

News Entry# 381029  Blog Entry# 4299149   
  Past Edits
Apr 23 2019 (08:15)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ✒^~/1269766

Apr 23 2019 (08:15)
Station Tag: Howrah Junction/HWH added by ✒^~/1269766

Apr 23 2019 (08:15)
Train Tag: Jnaneswari Super Deluxe Express/12102 added by ✒^~/1269766
Posted by: ✒^~ 523 news posts
नागपुरात गाडीत येताच लोहमार्ग पोलीस आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्व पिंजरे उतरवले.
नागपूर : पशु आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंबून रेल्वेने मुंबईला घेऊन जात असतानाचा प्रकार एका पक्षीप्रेमीच्या सतर्कने उघडकीस आला आहे. कोलकाता येथे रेल्वेच्या पार्सल बोगीत पिंजरे चढवल्याची चित्रफित फेसबुकवर टाकून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या मंत्रालयाला कळवले आहे.
हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत लव बर्ड, कबूतर, पांढरे उंदीर, ससा व  इतर पशुंचे नऊ पिंजरे होते. त्यात सुमारे हजार पशू व पक्षी होते. नागपुरात गाडीत येताच लोहमार्ग पोलीस आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्व पिंजरे उतरवले. त्यातील सुमारे १०० पशुपक्ष्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.
केंद्रीय
...
more...
मंत्री मनेका गांधी यांच्या कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या कार्यालयाने नागपुरातील मानद पशु कल्याण अधिकारी अंजील वैद्यर यांना कळवले. तत्पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून नागपुरातील पशु प्रेमींनाही या प्रकाराची माहिती मिळाली. वैद्यर यांनी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफला एक पत्र देऊन या घटनेची माहिती देत मदतीची विनंती केली.  घटनेची गंभीरता लक्षात घेत गाडी येण्यापूर्वीच सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, वनविभाग, पशुवैद्यक, मानद पशु अधिकारी आणि पशुप्रेमी संघटनांचे पदाधिकारी फलाट क्रमांक ८ वर पोहोचले. सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस येताच पार्सल व्हॅनमधून पशुपक्ष्यांचे नऊ पिंजरे उतरवण्यात आले. यावेळी पशुप्रेमी संघटनांचे पदाधिकारी करिश्मा गिलानी, मानद पशु कल्याण अधिकारी अंजील वैद्यर उपस्थित होते. सुमारे  एक हजार पशुपक्ष्यांपैकी सुमारे १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यर यांनी दिली. तत्पूर्वी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने नागपूरला येत असलेल्या शुब्रतो दास (३६, रा. कोलकाता) यांनी चित्रफित फेसबुकवर टाकली. उशिरापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy