Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Kolkata Metro: The only Metro of IR. কলকাতা মেট্রো : তিলোত্তমার জীবন রেখা ।। - PPG

Full Site Search
  Full Site Search  
 
Fri Aug 7 03:16:07 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 413525
Jul 09 (12:29) बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाची चाचणी यशस्वी, 'नवदूत'मुळे नव्या युगाची सुरुवात! (marathi.abplive.com)
New Facilities/Technology
WCR/West Central
0 Followers
12968 views

News Entry# 413525  Blog Entry# 4665314   
  Past Edits
Jul 09 2020 (12:29)
Station Tag: Jabalpur Junction/JBP added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529
Stations:  Jabalpur Junction/JBP  
भारतीय रेल्वेने एका नव्या युगात पाऊल ठेवले आहे. एका नवीन इंजिनाची निर्मिती भारतीय रेल्वेने केली आहे त्याचे नाव देखील 'नवदूत' असे ठेवण्यात आले आहे. हे इंजिन चक्क बॅटरी वर चालते. त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.
भारतीय रेल्वेने एका नव्या युगात पाऊल ठेवले आहे. एका नवीन इंजिनाची निर्मिती भारतीय रेल्वेने केली आहे त्याचे नाव देखील 'नवदूत' असे ठेवण्यात आले आहे. हे इंजिन चक्क बॅटरी वर चालते. त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. अशा प्रकारचे पहिलेच इंजिन भारतात बनवण्यात आले आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिरव्या
...
more...
रंगाचे इंजिन ट्रेन चालताना दिसत आहे. हे इंजिन पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात बनवले गेले आहे. या इंजिनाची खासियत म्हणजे हे इंजिन पूर्णतः बॅटरीवर चालणारे, शंटिंगसाठी वापरले जाणारे इंजिन आहे. या इंजिनामध्ये ड्युअल मोडची सुविधा उपलब्ध आहे. याचाच अर्थ, इंजिन दोन्ही बाजूने चालवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या इंजिनाचा व्हिडीओ ट्विट करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी, भारतीय रेल्वेसाठी हा एक उज्ज्वल भवितव्याचे संकेत आहे असे म्हटले आहे. ' 'नवदूत' या बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. या इंजिनामुळे डिझेल विकत घेण्यासाठी खर्च होणारे परकीय चलन वाचेल तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील याचा खूप मोठा उपयोग होईल', असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
यासाठी होणार नवदूतचा वापर
हे 'नवदूत' इंजिन, शंटिंग प्रकारातले आहे. याचा उपयोग एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी होणार नाही. यार्डमधून ट्रेन स्टेशनवर आणण्यासाठी आणि स्टेशनवरून रिकाम्या ट्रेन यार्डमध्ये नेण्यासाठी याचा उपयोग होईल. या कामासाठी सध्या डब्ल्यू डी एस 6, डब्ल्यू डी एस 6 AD अशा डिझेलवर चालणाऱ्या इंजिनांचा उपयोग होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. मात्र या नवीन इंजिनामध्ये उच्च क्षमता असलेल्या बॅटरीचा वापर केल्याने डिझेल खर्च न होता तसेच जिथे विद्युत पुरवठा नाही अशा रेल्वे मार्गांवर देखील या इंजिनाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे डिझेल आणि वीज या दोन्हीची बचत होईल.
इंजिनाची क्षमता 1200 हॉर्सपॉवर
पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागातील, कटनी इलेक्ट्रिक लोको शेड मध्ये, इलेक्ट्रिक इंजिनियर्सने या इंजिनाची निर्मिती केली आहे. या इंजिनाची क्षमता 1200 हॉर्सपॉवर आहे. त्याचे वजन 180 टन इतके असून त्याची लांबी 35 मीटर इतकी आहे. इंजिनाचा जास्तीत जास्त वेग 100 किलोमीटर प्रतितास असून तो 120 किलोमीटर प्रति तास इतका वाढवण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर हे इंजिन पूर्णतः एसी ट्रॅक्शन वर चालणारे आहे. 'नवदूत' ची चाचणी यशस्वी झाली असली तरी अश्याच प्रकारचे आणखीन एक इंजिन कोटा इथे देखील बनवण्यात येत आहे. या नवीन इंजिनांमुळे रेल्वेच्या डिझेल जळण्याने होणारे प्रदुषण तसेच वीज निर्मिती साठी होणारा खर्च भविष्यात कमी होईल याबाबत शंका नाही.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy