News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Tue Jan 23, 2018 04:26:25 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Tue Jan 23, 2018 04:26:25 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   

News Posts by Soumitra Chawathe*^~

Page#    Showing 6 to 10 of 203 news entries  <<prev  next>>
  
Feb 27 2015 (08:58)  पुणे- मिरज डबल ट्रॅकसाठी 4670 कोटींची तरतूद (online3.esakal.com)
back to top
Rail BudgetCR/Central  -  

News Entry# 214347     
   Past Edits
Feb 27 2015 (8:58AM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by SOLO BACKPACKER**/301079

Feb 27 2015 (8:58AM)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by SOLO BACKPACKER**/301079

Feb 27 2015 (8:58AM)
Station Tag: Pune Junction/PUNE added by SOLO BACKPACKER**/301079
 
 
कोल्हापूर - पुणे- मिरज रेल्वेच्या दुहेरीकरणाचा पहिला टप्पा म्हणून रेल्वे अर्थसंकल्पात 4670 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र कोकणला जोडणाऱ्या कऱ्हाड- चिपळूण मार्गासाठीही 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी "सकाळ‘शी बोलताना दिली.

अनेक दिवसांपासून कोल्हापूर- पुणे रेल्वेच्या दुहेरीकरणाची मागणी होत होती. गेल्या अर्थसंकल्पात या मार्गाचे केवळ सर्वेक्षण करणार असल्याचे जाहीर केले होते. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात सातारा- कोल्हापूरच्या पदरात काहीच मिळाले नाही; परंतु त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे कोल्हापूर- पुणे मार्गाचे दुहेरीकरण करण्यास सुरवात करणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून 4670
...
more...
कोटी रुपये मंजूर केले आहेत.
कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती; परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड- चिपळूण मार्ग जोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या रेल्वेच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर कोकणशी जोडण्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले असले, तरी पश्‍चिम महाराष्ट्र कोकणशी जोडला गेला आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ""तत्कालीन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांना भेटून आपण विविध मागण्यांचे निवेदन 16 जून 2014 रोजी दिले होते. त्यात विविध मागण्या करून कोल्हापूरच्या रेल्वेप्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी त्यांचीही भेट घेऊन कोल्हापूर रेल्वेच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. कोल्हापूर- पुणे दुहेरीकरणासाठी पाठपुरावा केला. अखेरीस तो प्रश्‍न मार्गी लागला आहे. हे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.‘‘
  
Feb 27 2015 (08:56)  मध्य रेल्वेवर वर्षभरात 72 नवीन लोकल (online3.esakal.com)
back to top
Rail BudgetCR/Central  -  

News Entry# 214346     
   Past Edits
Feb 27 2015 (8:56AM)
Station Tag: Mumbai CST/CSTM added by SOLO BACKPACKER**/301079
Stations:  Mumbai CSM Terminus/CSTM  
 
 
मुंबई - मध्य रेल्वेवरील जुनाट लोकल भंगारात काढून नवीन 72 लोकल पुढील वर्षीपर्यंत धावू लागतील. महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रोप्रमाणे डब्यांत फिरते सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. प्रायोगिक तत्त्वावर 165 कॅमेरे लावले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे प्रभात सहाय उपस्थित होते.
एमयूटीपी-2 मधील प्रकल्पांसाठी रेल्वे अर्थसंकल्पात एक हजार 22 कोटींची तरतूद आहे. ए वन, ए व बी दर्जाच्या स्थानकांत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या सुविधा सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी विनामूल्य असतील. त्यानंतर त्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी माहिती या वेळी देण्यात आली. मुंबईतील मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट, बोरिवली, ठाणे, कल्याण, वांद्रे या स्थानकांचा यात समावेश आहे. पनवेल व ठाकुर्ली स्थानकांवर टर्मिनस
...
more...
बनवण्यात येतील, असे सूद यांनी सांगितले.
मध्य रेल्वेवरील डीसी ते एसी रूपांतर 31 मार्चपर्यंत पूर्ण होईल. वातानुकूलित गाडीची चाचणी ऑक्‍टोबरपर्यंत पश्‍चिम रेल्वेवर घेण्यात येईल. बंबार्डियर लोकल मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण
कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानिक रिक्षा व टॅक्‍सीचालकांना पर्यटनाचे गाईड म्हणून प्रशिक्षण दिले आहे. त्यांना टुरिस्ट गाईड म्हणून कोकण रेल्वेतर्फे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येईल आणि त्यातून किमान 50 हजार नागरिकांना स्वयंरोजगार मिळेल, असा विश्‍वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे.
  
Feb 27 2015 (08:54)  भाडेवाढ नसल्याने स्वागत; आरक्षणाबाबत नाराजी (online3.esakal.com)
back to top
Rail BudgetCR/Central  -  

News Entry# 214345     
   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
Stations:  Pune Junction/PUNE  
 
 
पुणे - केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेले रेल्वेचे अंदाजपत्रक हे प्रवासीभिमुख असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाडेवाढ न करण्याच्या निर्णयाचे स्वागत होत असून, तिकीट आरक्षणाचा कालावधी 60 दिवसांहून 120 दिवस करण्याच्या निर्णयावर मात्र नाराजी व्यक्त झाली. यामुळे तिकिटांचा काळाबाजार वाढण्याची भीती आहे.
भाजप सरकारचे पहिले रेल्वे अंदाजपत्रक गुरुवारी सादर झाले. रेल्वे मंत्री प्रभू यांनी सादर केलेल्या या अंदाजपत्रकावर पुण्यातील विविध प्रवासी संघांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया व्यक्त करीत त्याचे स्वागत केले. या अंदाजपत्रकात अनेक चांगल्या तरतुदी असून, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त झाले.
पुणे रेल्वे प्रवासी संघाचे
...
more...
अध्यक्ष कनुभाई त्रिवेदी म्हणाले, ""गेल्या 10 वर्षांत प्रवाशांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रत्येक घटकाचा विचार करून तयार केलेल्या या अंदाजपत्रकात रेल्वे मंत्र्यांची अभ्यासू वृत्ती दिसून येते. प्रवासी तिकीट दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय योग्य आहे. अनेक चांगल्या योजना सादर करीत, रेल्वे मंत्र्यांनी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही रेल्वेकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दिली आहे. प्रशासकीय अधिकाराचे विकेंद्रीकरण झाल्याने अनेक कामे त्वरित मार्गी लागतील.‘‘
""भाडे वाढ नाही, बायो टॉयलेट, रेल्वे क्रॉसिंगवर होणारे अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्ग तयार करणे, रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर करणे अशा अनेक चांगल्या तरतुदी यात आहे. महाराष्ट्र आणि पुण्याला या अंदाजपत्रकातून काय मिळाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आतापर्यंत महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे, प्रभू हे महाराष्ट्रातीलच असल्यामुळे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे‘‘, असे दौंड रेल्वे प्रवासी संघाचे विकास देशपांडे यांनी सांगितले.
या अंदाजपत्रकामुळे रेल्वे प्रवाशांना "अच्छे दिन‘ येतील अशी प्रतिक्रिया पुणे रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष मांगीलाल सोळंकी यांनी व्यक्त केली. रेल्वेचे डबे, स्थानक येथे स्वच्छता, नवीन शौचालयांची उभारणी, महिला प्रवाशांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांकरिता सरकता जिना, अतिजलद गाड्या या तरतुदींचे सोळंकी यांनी स्वागत केले.
प्रवाशांच्या दृष्टीने हे अंदाजपत्रक चांगले असल्याचे मत पुणे- मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे हेमंत टपाले यांनी व्यक्त केले. ""शेतकऱ्यांसाठी "किसान यात्रा‘, विविध मार्गांचे विद्युतीकरण, मार्गांचे विस्तारीकरण, प्रवाशांना रेल्वेविषयी "एसएमएस‘द्वारे माहिती देण्याची सुविधा उपयुक्त आहे. जनरल बोगींची संख्या वाढविल्याने आरक्षित डब्यांत होणारी गर्दी आणि जनरल डब्यातील गर्दी कमी होईल‘‘, असेही ते म्हणाले.
ग्राहक पंचायतीचे अशोक अगरवाल यांनी दौंड-बारामती-लोणंद या रेल्वे मार्गाचे काम करावे, अशी मागणी केली. ट्रॅव्हल्स संघटनेचे संतोष ठक्कर यांनी या अंदाजपत्रकात रेल्वेने ग्राहकांचा विचार केला आहे, त्यांना चांगली सेवा देण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होते, यावर पुढील चित्र अवलंबून असल्याचे मत व्यक्त केले.
""रेल्वेच्या विकासात राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करून घेण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. प्रवाशांकरिता हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. प्रत्येक घटकाचा विचार यात केला आहे‘‘, असे सतीश शहा यांनी सांगितले.
महाराष्ट्राची निराशा केली
पुणे-मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या हर्षा शहा यांनी तिकीट आरक्षणाचा कालावधी 60 दिवसांवरून 120 दिवस करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे नमूद केले. ""प्रभू यांनी महाराष्ट्राची निराशा केली. या अंदाजपत्रकात कोणतीही नवीन गाडी सुरू केली नाही. हे अंदाजपत्रक निराशाजनक आहे‘‘, असे त्या म्हणाल्या.
  
Feb 27 2015 (08:53)  पुणे-कोल्हापूर दुपदरीकरणासाठी निधी (online3.esakal.com)
back to top
Rail BudgetCR/Central  -  

News Entry# 214344   Blog Entry# 1381133     
   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
 
 
पुणे - पुणे ते कोल्हापूर मार्गाच्या दुपदरीकरणासाठी सर्वेक्षणाचे काम मार्गी लागले असून, यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुणे ते लोणावळा लोकलसाठी तिसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण तसेच पुण्याशी निगडित मार्गांचे सुरू असलेल्या सर्वेक्षणाकरिता वाढीव तरतूद या रेल्वे अंर्थसंकल्पात झाली आहे.
पुणे ते लोणावळा या लोकल सेवेवर वाढणारा ताण लक्षात घेऊन येथे तिसरा मार्ग सुरू करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद झाली आहे. सर्वेक्षणानंतर रेल्वेला जागा ताब्यात घ्याव्या लागतील. त्याचप्रमाणे पुणे ते कोल्हापूर या मार्गाच्या दुपदरीकरणाकरिता सर्वेक्षण करण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती. यावर्षी या कामासाठी संपूर्ण तरतूद केल्याने हे काम मार्गी लागणार आहे. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक वाढण्यास मदत होईल, असा विश्‍वास रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे
...
more...
यांनी व्यक्त केला.
पुणे रेल्वे स्थानक "वाय फाय‘ होणार आहे. या स्थानकाच्या विकासाकरिता तरतूद केल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. पुणे-मिरज या मार्गाचे दुपदरीकरण आणि पुणे-लोणावळा हा मार्ग तीनपदरी करण्यासाठी तरतूद झाल्याने भविष्यात या भागातील नागरिकांचा प्रवास आणखी सुलभ होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील डिझेल इंजिन शेडच्या विस्तारीकरणास मंजुरी मिळाली आहे. पुणे ते नगर, पुणे ते बारामती, पुणे ते नाशिक या मार्गाचे सर्वेक्षण सुरू असून, त्यासाठी अधिक तरतूद उपलब्ध करून दिली गेली आहे. पंढरपूर ते लोणंद, पंढरपूर ते विजापूर, कर्जत ते लोणावळा (चौथा मार्ग) या मार्गांच्या सर्वेक्षणाला गती मिळणार आहे. कराड ते चिपळूण या मार्गाचे सर्वेक्षण मार्गी लागल्याने भविष्यात पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण हे लोहमार्गाने जोडले जातील.
रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सबवे आणि उड्डाणपूल तयार करण्यास मंजुरी दिलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे : पुणे ते मिरज (गेट क्रमांक 109 आणि 130), दौंड ते सोलापूर (गेट क्रमांक 21), दौंड ते मोहोळ, दौंड ते बारामती, पुणे ते मिरज या मार्गावर अनुक्रमे 3, 2, 2 सबवे उभे करण्यास मान्यता दिली आहे.

  
5204 views
Feb 27 2015 (09:58)
Hung Election this time~   4661 blog posts   334 correct pred (68% accurate)
Re# 1381133-1            Tags   Past Edits
Line survey/work for Pandharpur - Vijayapura is transfered to SWR from CR in last year.
It's good that some amount has been released for these kind of projects also.
  
Dec 24 2014 (09:19)  EXTENSION OF PUNE - HABIBGANJ & PUNE - JABALPUR SUPERFAST SPECIAL TRAINS (cr.indianrailways.gov.in)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  IR Press Release  

News Entry# 206156   Blog Entry# 1318100     
   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
 
 
Central Railway has decided to EXTEND the run of following Superfast Special trains o­n the existing days, stoppages and timings to clear the extra rush of Passengers. The details are as under:

A) PUNE-HABIBGANJ-PUNE WEEKLY SUPERFAST SPECIAL (22)
01651 Weekly Superfast special leaving Pune at 2.15 pm o­n every Tuesday extended upto 13.1.2015 (2 trips) and will reach Habibganj at 5.30 am
...
more...
next day.
01652 Weekly Superfast special leaving Habibganj at 5.25 pm o­n every Saturday extended upto 10.1.2015 (2 trips) and will reach Pune at 9.20 am next day.
HALTS: Daund, Ahmednagar, Kopargaon, Manmad, Bhusaval, Khandwa, Harda and Itarsi
B) PUNE-JABALPUR-PUNE WEEKLY SUPERFAST SPECIAL (22)
01655 Weekly Superfast special leaving Pune at 11.15 am o­n every Sunday extended upto 11.1.2015 (2 trips) and will reach Jabalpur at 6.00 am next day.
01656 Weekly Superfast special leaving Jabalpur at 4.55 pm o­n every Monday extended upto 12.1.2015 (2 trips) and will reach Pune at 11.05 am next day.
HALTS: Daund, Ahmednagar, Kopargaon, Manmad, Bhusaval, Khandwa, Harda, Itarsi, Pipariya and Narsinghpur
COMPOSITION OF BOTH THE SPECIALS: Two AC 3-Tier, o­ne AC 2-Tier cum AC 3-Tier, Eight Sleeper class, 4 General second class and 2 General second class cum guard's brake vans.
RESERVATION: Bookings for extended specials of 01651 & 01655 will open from 24.12.2014.
--- --- --- --- --- --
Date: December 23, 2014.

  
Dec 24 2014 (09:24)
Soumitra Chawathe*^~   30357 blog posts   100926 correct pred (72% accurate)
Re# 1318100-1            Tags   Past Edits
Extended as expected!!

  
5431 views
Dec 24 2014 (09:53)
Cheetah Prayas Rajhans all r my favorite Locos*^~   16743 blog posts   54765 correct pred (63% accurate)
Re# 1318100-2            Tags   Past Edits
Rglr jhali pahije aata....
:)

  
5336 views
Dec 24 2014 (10:02)
Paurav Shah~   13536 blog posts   26 correct pred (72% accurate)
Re# 1318100-3            Tags   Past Edits
Barobar Azar bhai. Aata hi regular vhayla pahije ya budget madhe.

  
4915 views
Dec 24 2014 (12:42)
AK84~   2380 blog posts   2759 correct pred (76% accurate)
Re# 1318100-4            Tags   Past Edits
with commercial stoppage @Jalgaon
Page#    203 news entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.