खेड शहरातून रेस्टेस्टेशनला जोडणारा पूल जगबुडी नदीपात्रावर उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या पुलामुळे शहरवासियांसह खेड-दापोली, मंडणगड तालुक्यातील चाकरमान्यांना सोयीचे ठरणार असून याद्वारे त्यांचा वेळ व पैसा देखील वाचणार असल्याचा दावा आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला.
आमदार संजय कदम यांनी गुलमोहर पार्क परिसरात जावून पूल कोठे व कशाप्रकारे बांधण्यात येईल याबाबत पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले,
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातून रेल्वेस्टेशनला जोडणाऱया पुलाची मागणी नागरिकांतून होत होती. प्रवाशांना रेल्वेस्टेशनला जायचे असल्यास खेड-भोस्ते मार्गे अरूंद पुलावरून अथवा खेड-भरणे मार्गे रेल्वेस्टेशन असा 3 ते 6 कि.मी.चा वळसा मारावा लागत...
more... होता. यात वेळ व पैसा देखील खर्च होतो. खेड व भरणे मार्गाच्या मधोमध असणाऱया जगबुडी नदीच्या पलिकडेच रेल्वेस्टेशन आहे. भरणे किंवा भास्ते मार्गे जावे लागते. त्यामुळे नवीन पुलाच्या निर्मितीनंतर रेल्वेस्टेशन अवघ्या काही मिनिटांचा होणार असून प्रवाशांना दिलासादायक ठरणार आहे. तसेच भरणे नाक्याला देखील पर्यायी मार्ग होवू शकतो.
या पुलाच्या उभारणीकरिता नाबार्डचे अर्थसहाय्य लाभणार असून शहरवासीय व चाकरमान्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. पुलामुळे शहरातून रेल्वेस्टेशनला जाण्यासाठी 3 कि.मी.चे अंतर तसेच वेळ व पैसा वाचणार आहे. या नवीन मार्गाचा शहरातील स्वरूपनगर, महाडनाका, डाकबंगला, गुलमोहर पार्क, शिवनेरी नगर येथील नागरिकांना सर्वात मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
या पाहणी दौऱयाप्रसंगी नगरसेवक सतिश चिकणे, मिलिंद इवलेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व खेड नगरपालिकेचे अधिकारी, अभियंते, उद्योजक मेहबूब महाडिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.