Timeline UpdatesTrip UpdatesNews PostsPvt PostsAdmin PostsFollowed PostsChat RequestsBlog PostsPNR Posts

Disclaimer
Search
 
 
Thu May 23, 2013 08:44:08 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsMembersLoginFeedback
News Super Search **new        show english news only
<<prev entry    next entry>>
News Entry# 74244  
1 News Items

0 Comments
कल्याणपाठोपाठ ठाणे स्टेशन परिसरातही सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे उद्घाटन मंगळवारी संध्याकाळी करण्यात आले. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला व उपनगरी लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर ठाणे व कल्याणसारख्या महत्वाच्या व सदोदीत वर्दळीच्या स्टेशन परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत होती.
ठाणे स्टेशन परिसरात ३२ कॅमेरे बसवण्यात आले असून , या अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे रात्रीच्या वेळीही चित्रीकरण होऊ शकेल. या कॅमेऱ्यांवर साडेआठ लाख रुपये खर्च झाला असून , त्यासाठी ठाण्याचे शिवसेना आमदार राजन विचारे यांनी आमदार निधी देऊ केलाय. शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे व पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्या हस्ते तसेच , महापौर हरिश्चंद्र पाटील व वाहतूक शाखेचे डीसीपी डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.
Scroll to Top