News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Mon Jun 26, 2017 16:29:12 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Mon Jun 26, 2017 16:29:12 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   
<<prev entry    next entry>>
News Entry# 76968
  
Jun 10 2012 (23:56)  ‘तत्काळ’ तिकिटे होणार मुबलक-----मुंबई (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
Other News

News Entry# 76968     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: Jayashree ❖ Amita*^  36806 news posts
मुंबई
एक्स्प्रेसला जोडलेल्या अतिरिक्त कोचमधील तिकिटे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिल्यावर उरणारी सर्व तिकिटे ' तत्काळ ' साठी देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर चालणाऱ्या या उपक्रमात सीएसटीवरून सुटणा-या १४ सर्वाधिक गर्दीच्या एक्स्प्रेसची निवड करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही ही योजना राबवली जाणार आहे.
सीएसटीवरून सुटणाऱ्या सेवाग्राम , प्रगती , डेक्कन , औरंगाबाद जनशताब्दी , दादर-साईनगर शिर्डीसारख्या १४ एक्स्प्रेससाठी ही ऑन डिमांड योजना राबवली जाणार आहे. नव्या योजनेनुसार या एक्स्प्रेसलाअतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहेत. यातील उपलब्ध तिकिटे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिल्यानंतर उर्वरित तिकिटांसाठी तत्काळ तिकिटधारकांना सर्वाधिक
...
more...
प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रवाशांना ही तिकिटे दिली जाणार आहेत. मुंबई-पुणे , मुंबई-नागपूर , पुणे-नागपूर या मार्गांवरील गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. ही योजना यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही चालवली जाणार आहे.
तत्काळ तिकीटधारकांना दिलासा
ऐनवेळी प्रवास किंवा तिकीट आरक्षित न झालेले प्रवासी तत्काळ तिकीट काढतात. पण या योजनेतून तिकीट आरक्षित न होण्याचा अनुभव येतो. हे लक्षात घेऊन या योजनेत प्राधान्यक्रम तत्काळ तिकीटधारकांना देण्यात आला आहे. त्यांना तिकिटे दिल्यावर उरलेली तिकीट अन्य प्रवाशांना दिली जाणार आहेत.
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.