अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाने खास प्रवाशांसाठी विशेष फेरीचे नियोजन केले आहे. मध्यरेल्वेद्वारा सोडण्यात येणाऱ्या प्रत्येक गाडीचा थांबा बडनेरा स्टेशनवर देण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय थांबविण्यासाठी या विशेष फेऱ्यांचे नियोजन मध्यरेल्वेने केले आहे. गाडी क्रमांक (01207) अप नागपूर - राजकोट ही गाडी 21 ऑक्टोबरपासून प्रत्येक सोमवारी रात्री 7 वाजून 50 मिनिटाला नागपूर स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 4.30 मिनिटाला राजकोटला पोहोचेल. या दरम्यान 3 फेऱ्या या गाडीच्या राहतील.
अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाने खास प्रवाशांसाठी विशेष फेरीचे नियोजन केले आहे. मध्यरेल्वेद्वारा सोडण्यात येणाऱ्या प्रत्येक गाडीचा थांबा बडनेरा स्टेशनवर देण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय थांबविण्यासाठी या विशेष फेऱ्यांचे नियोजन मध्यरेल्वेने केले आहे. गाडी क्रमांक (01207) अप नागपूर - राजकोट ही गाडी...
more... 21 ऑक्टोबरपासून प्रत्येक सोमवारी रात्री 7 वाजून 50 मिनिटाला नागपूर स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 4.30 मिनिटाला राजकोटला पोहोचेल. या दरम्यान 3 फेऱ्या या गाडीच्या राहतील. गाडी क्रमांक (01208) डाउन राजकोट - नागपूर ही गाडी प्रत्येक मंगळवारी राजकोटवरून रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 10 वाजून 15 मिनिटाला नागपूरला पोहोचेल. 22 ऑक्टोबरपासून या गाडीच्या प्रत्येक मंगळवारी तीन फेऱ्या राहतील.वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदूरबार, सूरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद व सुरेंद्रनगर स्थानकावर ही गाडी थांबेल. गाडी क्रमांक (01419) डाउन पुणे-नागपूर ही गाडी 18 ऑक्टोबरपासून प्रत्येक शुक्रवारी तीन फेऱ्या करेल. रात्री 9 वाजून 30 मिनिटाला पुणेवरून सुटून शनिवारी दुपारी 2 वाजून 30 मिनिटाला नागपूरला पोहोचेल.गाडी क्रमांक (01419)अप नागपूर - पुणे ही गाडी 20 ऑक्टोबरपासून प्रत्येक रविवारी तीन फेऱ्या करत नागपूरवरून सुटेल. दुपारी 4 वाजता नागपूरवरून सुटून सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता पुणेला पोहोचेल. लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगावरेल्वे व वर्धा स्थानकावर गाडी थांबेल. गाडी क्रमांक (08610) डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस - हटिया ही गाडी 4 ऑक्टाबेरपासून प्रत्येक शुक्रवारी 5 फेऱ्या करेल. एलटीटीवरून सकाळी 7.55 मिनिटाला सुटूनशनिवारला दुपासी 5.30 मिनिटाला हटिया पोहोचेल. गाडी क्रमांक (08609) अप हटिया - एलटीटी ही गाडी 2 ऑक्टोबरपासून पाच फेऱ्या करत प्रत्येक बुधवारी हटियावरून सायंकाळी 5. 35 मिनिटाला सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 11.55 मिनिटाला एलटीटी पोहोचेल. कल्याण, इगतपुरी, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगडा व राऊलकेला स्थानकावर गाडी थांबेल.