विलासराव देशमुख आजही "रिचेबल'
Tags: vilasrao deshmukh, mumbai, maharashtra, politics, congress
मोबाईल डायल करताच ऐकू येताहेत त्यांची "भाषणे'
मुंबई - मुख्यमंत्री असो अथवा केंद्रीय मंत्री, मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल घेऊन प्रतिसाद देणारे दिवंगत...
more... विलासराव देशमुख यांचा मोबाईल आजही "रिचेबल' आहे. त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना विलासरावांचा जुन्या क्रमांकाचा मोबाईल सेवेत आहे. त्यावर त्यांचा आवाजही ऐकू येतोय. पण प्रत्येक कॉल घेत, "हॅलो, बोला. मी विलासराव बोलतोय,' असा दिलखुलास आवाज आज कानावर पडत नाही; तर त्यांच्या गाजलेल्या दिलखुलास भाषणांचा आवाज घुमतो.
विलासराव आणि त्यांचे कार्यकर्ते, चाहते यांच्यात आता संवाद होत नसला, तरी त्यांचा मोबाईल डायल करून दिलखुलास विलासरावांच्या भूतकाळातल्या आठवणी ताज्या होत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आजही कायम ठेवण्याचा हा अभिनव आणि भावनिक उपक्रम अविरत सुरू राहील याची काळजी विलासरावांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
"मी महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात फिरत असताना लातूरमध्ये माझे कार्यकर्ते माझी निवडणूक लढवतात. स्वत: विलासराव समजून कार्यकर्ते काम करतात,' अशी कार्यकर्त्यांना उमेद देणारी त्यांची गाजलेली भाषणे त्यांच्या मोबाईलवर सुरू ठेवण्यात आली आहेत.
आजही त्यांचा 9821125000 हा मोबाईल क्रमांक चालू आहे. तो त्यांच्या कुटुंबीयांनी सुरू ठेवला आहे.