१ जुलैपासून धावणार अमरावती-नरखेड पॅसेंजर
बोर्डाचे आदेश : पॅसेंजर गाडी सुरू करण्याच्या हालचाली सुरू
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या अमरावती ते नरखेड ही पॅसेंजर गाडी सुरू करण्यासंदर्भात लेखी आदेश रेल्वे बोर्डाने भुसावळ येथील डिव्हीजनला प्राप्त झाले आहेत.
ही गाडी येत्या १ जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती आहे. केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये १३७ किलोमीटर अंतर लांबीच्या अमरावती - नरखेड या...
more... नव्या रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांना ही गाडी केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा लागली होती. गेल्या आठवड्याभरापूर्वीच या संदर्भातील आदेश भुसावळ येथे धडकले असून या आदेशाची प्रत अमरावती येथेही प्राप्त झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील सूत्रांनी दिली. येत्या १ जुलैपासून ही गाडीसुरू करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता भुसावळ येथील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याला दुजोरा देण्यात आला आहे.
४नवीन अमरावती ते नरखेडपर्यंत धावणार्या पॅसेंजर गाडीला सहा डबे राहणार आहेत. यापैकी चार डबे सामान्य तर दोन डबे मागे व पुढे गार्डसाठी राहणार आहेत.
४१ जुलैपासून अमरावती ते नरखेड मार्गावर धावणार्या पॅसेंजर गाडीला १२ ठिकाणी थांबे राहणार आहे. ही गाडी दररोज १ फेरी पूर्ण करणार आहे. सी- क्लास रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.
अनेक समस्या कायमच
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अमरावती रेल्वे स्टेशनवर केवळ रेल्वे स्थानक प्रमुख यांचीच नियुक्ती केली आहे. ही पॅसेंजर गाडी सुरू होताच नवीन अमरावती स्टेशन ते नरखेडपर्यंत धावणार आहे. नवीन स्टेशनवर सीएनडब्ल्यू, आरपीएफ, लोको ऑपरेटींग, सफाई कर्मचारी व अतिरिक्त कर्मचार्यांच्या नियुक्त्या करणे तत्पूर्वी आवश्यक आहे. ही पॅसेंजर बडनेरा ते नरखेडपर्यंंत सुरू करावी, अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्यादृष्टीने प्रशासनसुद्धा तयारीला लागले आहेत.