अकोला - जिल्ह्यातील पारस येथे पावसामुळे रेल्वे मार्ग खचल्याने नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहर व परिसरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पारसजवळ रेल्वे रूळाखालील स्लीपर्स वाहून गेल्या आहेत. यामुळे अनेक गाड्या थांबविण्यात आला असून, काही गाड्या वेगळ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीचे काम सूरू आहे. रेल्वे सेवा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता आहे.