नांदेड-पुणे एक्स्प्रेस मार्गे लातूर च्या वेळेत बदल
गाडी संख्या १७६१४ हु. स. नांदेड ते पुणे त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेस च्या वेळेत दिनांक १५.१०.२०१६ (शनिवार) पासून बदल करण्यात आला आहे. पूर्वी हि गाडी नांदेड येथून रात्री २०.३० वाजता सुटत होती ती आता नांदेड स्थानकाहून सायंकाळी १७.३० वाजता सुटेल.
गाडीच्या...
more... दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हि गाडी नांदेड येथून पूर्वी प्रमाणेच बुधवार, शुक्रवार आणि शनिवार ला सुटेल.
तसेच परतीची गाडी संख्या १७६१३ पुणे ते नांदेड च्या वेळेत आणि दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या कार्यालयाने पूर्वी कळविल्या प्रमाणे नांदेड ते पनवेल मार्गे लातूर पुणे हि गाडी पण नांदेड येथून सायंकाळी १७.३० वाजता सुटेल आणि ती नांदेड येथून दर रविवारी, सोमवारी आणि गुरुवारी सुटेल. म्हणजेच आता नांदेड येथून लातूर मार्गे पुणे ला जाण्या साठी आठवड्याच्या सहा दिवस ( रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार) गाडी उपलब्ध झाली आहे. या दोन्ही गाड्या नांदेड येथून सायंकाळी १७.३० वाजता सुटतील.
गाडी संख्या १२७३० नांदेड ते पुणे मार्गे औरंगाबाद, मनमाड च्या वेळेत तसेच दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही