नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि आचार संहिता लागू होऊन आता पंधरवडा उलटत आला आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतरही रेल्वेची तिकीटे आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे हटवण्यात आलेली नाहीत. या प्रकाराची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून, याबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश रेल्वे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले आहेत.
विविध सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध ठिकाणी पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा वापर होत असतो. रेल्वेची तिकिटे आणि एअर इंडियाच्या विमानांच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे छापून विविध योजनांची माहिती देण्यात येत असे. मात्र लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्रे रेल्वेची तिकिटे आणि विमानाच्या बोर्डिंग पासवरून हटवणे आवश्यक होते. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतरही हे फोटो...
more... हवण्यात आले नव्हते. अखेरीस याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने रेल्वे मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतून मंत्रालयालाकारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या संदर्भात तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने त्यांना दिले आहेत.