16 bogies of goods train derailed near Adarki on Pune - Kolhapur route today early morning. Passenger traffic on this route is badly affected. Waiting for more info from CR...
पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावर आदर्कीजवळ आज (बुधवार) पहाटे पाचच्या सुमारास मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक ठप्प झाल्याने पुणे आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या मालगाडीचे 16 डबे घसरले. त्यातील नऊ डबे दरीवजा खोल भागात पडले आहेत. या अपघातामुळे पूर्ण रूळ उखडला असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे....
more... यामुळे कोयना, गोंदिया एक्सप्रेससह सर्व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, वाहतूक पूर्ववत होण्यास बराच वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.